मराठा समाजाकडून कागल आणि चंदगड विधानसभा मतदार संघात उमेदवार देण्याबाबत चर्चा
गडहिंग्लज येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाची बैठक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाज गडहिंग्लज यांची काल बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये होऊ घातलेल्या कागल आणि चंदगड विधानसभा मतदार संघात समाजाचे उमेदवार देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
आतापर्यंत सकल मराठा समाजाचा सर्व राजकीय पक्षांनी वापर करून घेतला आहे. परंतु समाजाचे काही कल्याण केले नाह. फक्त निवडणुकीतपुरते वापर केला आहे. यावेळी समाजातील सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून निवडून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
गेली कित्येक वर्षे समाजाचा राज्यकर्त्यांनी वापर करून घेतला आहे. त्यांनी कधीच मराठा समाजासाठी मंगल कार्यालय, गोरगरीब मराठा समाजातील मुला, मुलींसाठी वस्तीगृह, अभ्यासिका, रोजगार, उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न केला नाही. राज्यकर्त्यांनी आमच्या समाजासाठी काहीच केले नाही हे दुर्दैवी आहे. 'आता आमचं ठरलंय आपला समाज, आमची माती आमची माणसं'. यातीलच गोरगरिबांचा कार्यकर्ता आमदार करायचा त्याशिवाय गप्पा बसायचं नाही. असा निर्धार बैठकीत करण्यात आला. यासाठी लवकरच मेळावा घेण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.
यावेळी उपस्थित अखिल भारतीय मराठा महासंघ गडहिंग्लज तालुका अध्यक्ष सुधीर उर्फ आप्पा शिवणे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, तालुका सरचिटणीस प्रकाश पोवार, कार्याध्यक्ष बबन कळेकर, शहराध्यक्ष सागर कुराडे, शहर उपाध्यक्ष शिवाजी कुराडे, जय गणेशचे अध्यक्ष संजू आण्णा पाटील, दीपक शिवणे, युवा नेते युवराज बरगे, बाळासाहेब भैस्कर, शिवाजीराव रेडेकर, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश हळदकर , मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चव्हाण, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम देसाई, युवक शहराध्यक्ष संतोष चौगुले, शिवसेना अध्यक्ष सागर मांजरे, मनोज पोवार, विश्वास दादा खोत, संदीप मांडेकर, नाथा रेगडे, शैलेश इंगवले, विनायक पोवार, सुरज पवार, अशोक जगदाळे, धनंजय मोरबाळे, विजय केसरकर, स्वप्निल साळोखे, संजय दळवी, दिपक खांडेकर, गोपी पोवार, शैलेश पाटील, राजू बरगे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीनंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष, हिरलगे गावचे सरपंच सचिन देसाई यांची सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक एल. डी. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


