छायाचित्र : अशपाक किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार सरासरी 68.58 टक्के इतके मतदान झाले.
दुपारी तीन नंतर बहुतांश मतदार केंद्रांवर मतदानासाठी मतदारांची मोठी गर्दी होताना दिसली. सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्ते व समर्थकांनी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. घरातून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मतदारसंघात 68.58 टक्के इतके सरासरी मतदान झाले आहे.

