Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्यातील बिद्रेवाडी येथे एकाचा गेला हकनाक बळी

अजित उर्फ गोपाळ गुरव याचा झाला दुर्दैवी मृत्यू 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील बिद्रेवाडी येथे एकाचा हकनाक बळी गेला. अजित उर्फ गोपाळ गुरव असे त्या 42 वर्षीय दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. चोर सोडून संन्याशाला शिक्षा मिळाल्यासारख्या या प्रकाराने नेसरी पंचक्रोशी पुन्हा एकदा हादरली आहे. 



याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सचिन नाईक आणि उत्तम नाईक हे दोघे एकमेकांशेजारी  राहत होते. ७ जानेवारी २०२४ रोजी यातील सचिन याने उत्तम यास ‘माझ्या बायकोकडे का बघतोस?’ असे विचारत डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. त्यातच उत्तम याचा मृत्यू झाला होता तर फरार झालेल्या सचिन यास  स्थानिक गुन्हे शाखेने 13 दिवसांनी सापळा रचून अटक केली होती. त्यानंतर तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. तर वडिलांना मारलेल्या सचिनचा  राग उत्तम नाईक यांचा मुलगा अक्षय नाईक याला होता. आज मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सचिन नाईक हा दुचाकीवरून अजित उर्फ गोपाळ गुरव याच्यासह जात असताना अक्षय याने दुचाकीची बॅटरी सचिनच्या दिशेने फेकली मात्र त्याने ती खाली वाकत चुकवली आणि ती मागे बसलेल्या गुरव याच्या डोक्याला लागली. त्यामुळे तो रस्त्यावर पडला आणि गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला गडहिंग्लजयेथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. याबाबत नेसरी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.



मात्र जानेवारी महिन्यात खुनाच्या घटनेने हादरलेली नेसरी पंचक्रोशी, आता त्याच्याशी निगडीत घटनेत गेलेल्या निष्पाप जीवाच्या बळीने पुन्हा एकदा हादरली आहे. मृत अजित उर्फ गोपाळ गुरव यांच्या पश्च्यात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असून त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.