Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला उद्यापासून अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा

युनायटेड चषक : चार राज्यांचा सहभाग 


एकूण अडीच लाखांची बक्षिसे




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत उद्यापासून ( ता. ५) अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह लगतच्या कर्नाटक, गोवा आणि केरळ राज्यातील चौदा संघ सहभागी आहे. स्पर्धेसाठी एकुण अडीच लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावरील स्पर्धेची तयारी पुर्ण झाली आहे.



एम. आर. हायस्कूल मैदानाची गेले आठवडाभरापासून सुरु असणारी दुरुस्ती पुर्ण झाली. खेळांडूनी श्रमदानातून माती टाकून खड्डे भरण्यासह रोलरने सपाटीकरण केले. सायंकाळच्या सत्रात खेळाडूंनी मैदानाची आखणी पुर्ण केली. मैदानाभोवती लोंखडी अडथळे उभारण्यात आले आहेत. खेळाडू, शौकीन यांच्या स्वागतासाठी स्वागत कमान उभारण्यात आली आहे.  सायंकाळी स्पर्धेतील मिरज, सोलापूर संघ दाखल झाले. उद्या दुपारच्या सत्रात दोन सामने होणार आहेत. दुपारी दोन वाजता स्पर्धेचा पहिला सामना आहे. स्पर्धेत गोव्याचे सेसा अँकाडमी, एफसी गोवा (राखीव) असे दोन संघ असून केरळचा एजीएस त्रिवेंद्रम आणि मुंबईचा बदोडा बँकेसमोर इतरांची कसोटी आहे.  कोल्हापूर सम्राटनगर, मिरज जे. एफ., सोलापूर, बेळगाव दर्शन, मंगळूर, निपाणी आणि स्थानिक काळभैरव रोड, यजमान युनायटेड संघ लढणार आहेत. स्पर्धेतील सहभागी संघाची प्रवास भत्यासह निवास आणि भोजनाची व्यवस्था आहे. रोज सकाळी दोन आणि दुपारच्या सत्रात दोन असे चार सामने होणार आहेत.



उद्या सायंकाळी चार वाजता जेष्ठ फुटबॉलपटूंच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उदघाटन होणार असल्याची माहिती युनायटेडचे अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी, उपाध्यक्ष सुरेश कोळकी, समन्वयक सुल्तान शेख यांनी दिली.



लोकवर्गणीतून एकोणीसावे वर्ष


साठच्या दशकापासून गडहिंग्लजला दिवाळी फुटबॉल स्पर्धेची परंपरा आहे. वाढत्या महागाईमुळे देशभरातील मोठ्या शहरात बहुतांश अशा स्पर्धा इतिहासजमा झाल्या आहेत. पण, गडहिंग्लजकरांच्या लोकवर्गणीच्या जोरावर स्पर्धेने यंदा एकोणीसावे वर्ष गाठले आहे. दरवर्षी दोन महिने देणगी, धान्य संकलनापासून मैदानाची दुरुस्तीपर्यंत पडेल ते काम करून युनायटेडचे फुटबॉलपटू हि परंपरा टिकावी यासाठी मेहनत घेतात. परिणामी, राज्यातीलच नव्हे तर देशातील ग्रामीण भागात भरणारी उत्कृष्ट स्पर्धा असा याचा नावलौकिक झाला आहे.


व्हिडीओ येथे पहा 👇👇







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.