दुपारी तीन वाजेपर्यंत 54.63 टक्के मतदान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदारसंघात दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याचे चित्र दिसत आहे. बहुतांश मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसत आहे.
या मतदारसंघाचा विचार करता सकाळी 7.00 ते 9.00 पर्यंत 6.78 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी 7.00 ते 11 या वेळेत 22.01 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 39.13 टक्के तर दुपारी 3 वाजता सरासरी 54.63 टक्के इतके मतदान झाले आहे.

