सूर्यकांत पाटील व विशाल पुंडपळ या कार्यकर्त्यांनी ग्रामदैवतांना घातले दंडवत
आजरा : कागल विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सूर्यकांत पाटील व विशाल पुंडपळ या दोन कार्यकर्त्यांनी आरदाळ गावातील सर्व ग्रामदैवतांना दंडवत घालत विजयासाठी देवाला साकडे घातले.
यावेळी ग्रामस्थ व महिला कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. महादेव मंदिरामध्ये आरती करून येथून दंडवत घातले. त्यानंतर दत्त मंदिरापासून भैरी मंदिरापर्यंत वाजत गाजत दंडवत घालण्यात आले. ग्रामदैवत भैरीदेवाला साकडे घालून प्रचारास सुरुवात केली.
रविवार हा भैरीदेवाचा वार असल्याने प्रचाराची सुरुवात केली. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी जाधव, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव, उद्योजक शंकर पावले, प्रा. सुभाष शेळके, सरपंच रुपाली पाटील, ग्रा.पं. सदस्य विठ्ठल पोवार, मंगल पुंडपळ, महादेव पुंडपळ, स्वाती पाटील, प्रीतम पाटील, सुहास शिवणे, सुरेश पावले, शिवाजी पोवार, भिकाजी ससाने, दिलीप सोनार, मेघा ससाणे, बबन पाटील, अशोक पावले, बाळू पोवार, कृष्णा चव्हाण, विठ्ठल नाईक, सुनील डवरी, प्रकाश देसाई, वीरधवल देसाई, आनंदा डवरी, महादेव जाधव यांचेसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा. सुभाष शेळके म्हणाले, आपल्या मतदार संघात निष्कलंक निस्वार्थ उमेदवाराची गरज असून राजेंच्या रूपाने उमेदवार आपल्याला लाभला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला बळ मिळाले असून राजे आमदार झाल्यावर या भागाचा विकास करतील. शिवाजी गुरव म्हणाले, राजे आमदार होऊन महाविकास आघाडीचे मंत्री होणार आहेत. त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी राहूया त्यांना बळ देऊया असे आवाहन केले. उद्योजक शंकर पावले यांनी आभार मानले.



