मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली करण्यात आली. याबाबतची मागणी महाराष्ट्र काँग्रेसने केली होती.
पोलीस महासंचालक शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे शुक्ला यांची तातडीने बदली करावी अशी मागणी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली होती. शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असताना देखील सरकारने त्यांना २०२६ पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिल्याचा असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.

