Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गोपाळराव पाटील यांची माघार ; कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र त्यांचा पाठिंबा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर यांना की महाविकास आघाडीतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात असलेले विनायक उर्फे अप्पी पाटील यांना असणार याबाबतची स्पष्टता त्यांनी अद्याप केलेली नसून कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितल्याने त्यांचा नेमका पाठिंबा कोणाला असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



महाविकास आघाडीतून डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत काँग्रेसचे गोपाळराव पाटील, विनायक उर्फे अप्पी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, आज गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विनंतीला मान देत उमेदवार अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ते नेमके कोणाला पाठिंबा देणार? याबाबत अद्याप स्पष्टपणे सांगितले नसून कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.