Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरातील काही राष्ट्रीयकृत बँकांच्या पासबुक प्रिंटिंग मशीन कधी बंद कधी चालू ; ग्राहकांची गैरसोय

ठाकरे शिवसेना पक्षाने वेधले निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांचे लक्ष  


सेवा सुरळीत देण्यासंदर्भात बँकांना सूचना करण्याची केली मागणी 



गडहिंग्लज : शिवसेनेचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्याकडून निवेदन स्वीकारताना प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून प्राची येसरे. यावेळी उपस्थित लक्ष्मण पाच्छापुरे. 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील काही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पासबुक प्रिंटिंग मशीन बंद अवस्थेत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. संबंधित बँकांना ही सेवा सुरळीत देण्यासंदर्भात सूचना कराव्यात अशी मागणी ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी दिले आहे. सदर निवेदन प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून प्राची येसरे यांनी स्वीकारले.



या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने देशामध्ये सरकारी बँकांची स्थापना केली. त्यामुळे सर्वसामान्य, उच्च शिक्षित, उद्योजक, शालेय विद्यार्थी यांना सरकारी बँकांचा फायदा होत आला आहे. त्यामध्ये उद्योग उभारणी कर्ज, सोने तारण, वाहन कर्ज , सुरक्षितपणे पैसे पाठविण्याचे माध्यम  व विश्वासाचे ठिकाण म्हणजे सरकारी बँक ओळखली जाते. तर सर्व विभागाचे कामकाज हे बचत व इतर खात्यावर होत असते. त्यामध्ये आपले खात्यावरील पैसे किती काढले व किती शिल्लक आहे हे पासबुकच्या माध्यमातून समजते पूर्वी बँक कर्मचारी हे पेनाने लिखाण करुन पासबुक भरुन देत असत. नव्या डिजिटल जमान्यामध्ये पेन पासबुक प्रिटींग मशिन आल्याने अचुक छपाई होत आहे. 



मात्र गडहिंग्लज शहरात अंदाजे 7 ते 8 विविध सरकारी बँकांच्या शाखा असून  काही बँकामध्ये प्रिटींग मशिन बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांना ही सेवा सुरळीत देण्यासंदर्भात सूचना करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे. निवेदनावर उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, लक्ष्मण पाच्छापुरे, श्रीशैल साखरे, संभाजी येरुडकर आदींच्या सह्या आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.