Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गोवा, केरळ, मुंबई उपांत्य फेरीत

गडहिंग्लज युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा 


मंगळूर, गडहिंग्लजचे दोन्ही संघ पराभूत



गडहिंग्लज (प्रतिनिधी):
युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी एफसी गोवा अकॅडमी, केरळचा अकाऊँट ऑफ जनरल (एजी), मुंबईचे बडोदा बँक आणि महाराष्ट्र पोलीस यांनी प्रतिस्पर्धांना नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. गतवर्षीचा विजेता गोव्याचा सेसा अकॅडमी, मंगळूर येनिपोया विद्यापीठाला पराजयाला सामोरे जावे लागले. काळभैरी रोड एफसी (केबीआर) व यजमान गडहिंग्लज युनायटेडचे आव्हान संपुष्ठात आल्याने स्थानिक शौकीनांची निराशा झाली. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर हि स्पर्धा सुरु आहे.



सकाळच्या सत्रातील रोमहर्षक सामन्यात नवोदित एफसी गोवा अकॅडमीने माजी विजेत्या मंगळूर येनिपोया विद्यापीठाला सडनडेथमध्ये 12-11 असे नमवून उपांत्य फेरी  गाठली. निर्धारीत वेळेत (1-1) तर टायब्रेकरमध्येही (5-5) असा सामना बरोबरीत होता. दोन्ही संघातील सर्वच खेळाडूंनी अचूक पेनल्टीचे फटके मारून प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला संधीच न दिल्याने सामन्याची उत्कंठा वाढत गेली. सडनडेथच्या सहाव्या फटक्याला गोवा एफसीचा बदली गोलरक्षक अशर रिबेलो याने मंगरूळच्या सासुसचा फटका जमिनिशी लोळण घेत अडवून सहकाऱ्यांना जल्लोषाची संधी दिली. दरम्यान, निर्धारित वेळेत पुर्वार्धात एफसी गोव्याच्या सोसले गोम्स तर उत्तरार्धात मंगळूरच्या मोहम्मद हासीलने गोल केला होता.


दुसऱ्या सामन्यात अनपेक्षितपणे महाराष्ट्र पोलीसने गोव्याच्या सेसा अकॅडमीला  3-1 असे हरवले. अनुभवी महाराष्ट्र पोलीसच्या हुकमी खेळाडू हिकमत डेंबरेने लागोपाठ दोन गोल करून सेसा अकॅडमीला अडचणीत आणले. उत्तरार्धात 74 व्या मिनिटाला सेसाच्या जोशवा करियूने गोल मारून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलीसच्या रोहित सुर्यवंशीने संघाची तिसरा गोल गोल करून धक्कादायक विजयावर शिक्कामोर्तब केले.




दुपारच्या सत्रातील सामन्यात बडोदा बँकेने केबीआरचा 4-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. मुंबईच्या डेन्झिल मस्करनेसने दोन, ओवीस अन्सारीने एक गोल करून वर्चस्व राखले. तुल्यबळ लढत देणाऱ्या गडहिंग्लज युनाटेडच्या खेळाडूने शेवटच्या पाच मिनिटात गोल क्षेत्रात केरळच्या खेळाडूला पाडल्याने मिळालेल्या पेनल्टीवर अश्रुद्दीनने अचूक गोल करून संघाला उपांत्य फेरीत पोहचवले. नवोदित युनायटेडने सुत्रबध्द खेळ करत अनुभवी केरळला मध्यतरापर्यंत 0-0 असे बरोबरीत रोखले होते. सागर पोवारचे प्रयत्न अपुरे पडले.  




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.