Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ आजऱ्यात शिवसेना व मुस्लिम बांधवांची बैठक

प्रचाराचा जोरदार धडाका; मतदारांमधून चांगला प्रतिसाद  




आजरा : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कार्यकर्त्यांनी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर आजरा येथे मुस्लिम बांधवांसमवेत बैठक घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय करण्याचे आवाहन करण्यात आले.



महाविकास आघाडीतून  राधानगरी विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) मिळाली आहे. या ठिकाणी के. पी. पाटील निवडणूक रिंगणात आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा राधानगरी, भुदरगड हे दोन तालुके व आजरा तालुक्यातील आजरा महसूल मंडळ मिळून तयार झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आजऱ्यातील मतदारांचीही भूमिका महत्त्वाची ठरते.



यावेळी बोलताना शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, आजऱ्याच्या शाश्वत विकासासाठी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी. पाटील यांना विधानसभेत पाठविण्याची गरज आहे. येथील मुस्लिम बांधवांची साथ मिळाल्यास श्री. पाटील मोठ्या मताधिक्याने विजय होतील, यात तीळमात्र शंका नाही. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.



या बैठकीस शिवसेनेचे कोल्हापूर  जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शित्रे, सह समन्वयक महेश लाड, विधानसभा सपर्क प्रमुख दिनानाथ चौगले, सह सपर्कप्रमुख अस्लम हाजी सय्यद, कोल्हापूर मुस्लिम नेते खाजूर कादर, तालुकाप्रमुख युवराज पोवार, उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव यांच्यासह शिवसैनिक व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.