Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव येथील मतदान केंद्रांची केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी

गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक मतदान केंद्रे असणारे गाव 


केंद्रांवरील सोयी-सुविधा बाबत घेतली माहिती ; व्यक्त केले समाधान 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील मतदान केंद्रांना केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्वेतिका सचन यांनी भेट देऊन पहाणी केली.



गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच पाच पेक्षा जास्त मतदान केंद्रे भडगाव या ठिकाणी आहेत. एकूण सात मतदान केंद्र असणाऱ्या या गावात मतदारांची संख्या देखील सर्वाधिक आहे. येथील केंद्र शाळेत ही मतदान केंद्रे आहेत.



यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्वेतिका सचन यांनी या केंद्रांवर उपलब्ध सोई सुविधांबाबत सविस्तर माहिती घेत समाधान व्यक्त केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव, पोलीस निरीक्षक सतीश होडगर, मंडल अधिकारी आर. बी. पाटील, तलाठी  सौ. रूपाली कांबळे, शिक्षिका जयश्री भुसुरी यांच्यासह इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.