Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबईच्या संघातच अंतिम लढत

गडहिंग्लज युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा 


गोवा, केरळ पराभूत




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी आज मुंबईच्या बडोदा बँक आणि महाराष्ट्र पोलीस संघानी आपपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी चुरशीच्या उपांत्य लढतीत अनुक्रमे एफसी गोवा अकॅडमी आणि केरळचा एजी क्लबला पराभूत केले. उद्या (ता. ९) दुपारी तिसऱ्या क्रमांकाचा आणि अंतिम सामना होणार आहे. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर या स्पर्धा सुरु आहेत.



दुपारच्या सत्रातील पहिल्या रंगतदार उपांत्य लढतीत अनपेक्षितपणे महाराष्ट्र पोलीसने गतवर्षीच्या उपविजेत्या एफसी गोवा अँकाडमीला टायब्रेकरमध्ये ४-३ असे नमविले. निर्धारित वेळेत सामना गोलशुन्य बरोबरीत होता. पुर्वार्धात पोलीसने सावध खेळ करत गोव्याच्या आक्रमक खेळाला लगाम घातला. उत्तरार्धात मुंबईच्या धोकादायक खेळ करणाऱ्या मुंबईच्या दिगंबर कदमला लाल कार्ड दाखवून बाहेर काढले. पण, अचूकते अभावी गोव्याला याचा फायदा उठवता आला नाही. टायब्रेकरमध्ये मुंबईचा गोलरक्षक शेखर पारतवार याने पेनल्टीचे दोन फटके अडवून विजयात सिंहाचा वाटा उचलला. गोव्याचा बदली गोलरक्षक अशहर रिबेलोने पेनल्टीचा फटका अडवून संघाला तारण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या हनिफ शेख, हिमकेत डेमभुंरे, दिपक पाटील, शलेझ खान यांनी तर एफसी गोव्याच्या लेनॉर्ड बेबीलो, शुभ रुक, शेरलॉक डायस यांनाच गोल मारता आले.




चुरशीच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या बडोदा बँकेने तुल्यबळ केरळच्या एजी क्लबला २-० गोलनी हरवून घौडदौड कायम ठेवली. सुरवातीपासून मुंबईने जलद खेळ करत चेंडूवर ताबा ठेवला. यातूनच मध्यतंराला केवळ एक मनिट असताना केरळच्या बचावपटूने गोल क्षेत्रात हाताने चेंडू हाताळल्याने पंचानी पेनल्टी दिली. यावर मुंबईच्या डेन्झिल मस्करनेसने अचूक गोल करून आघाडी घेतली. उत्तरार्धात मुंबईच्या तुलनेत केरळने अधिक आक्रमक खेळ केला. पण, मुंबईच्या गोलरक्षक रोहित पाटील, बचावपटू अथर अन्सारी, अनस खान आणि सहका-यांनी केरळचे मनसुबे उधळून लावले. ६१ व्या मिनिटाला केरळच्या फसलचा उत्कृष्ट फटका गोलखांबाला आदळल्याने बरोबरीची संधी हुकली. ७२ व्या मिनिटाला मुंबईच्या ओवीस अन्सारीने केरळचे खेळाडू गोल फेडण्यासाठी पुढे गेलेल्या संधीचा फायदा उठवत मैदानी गोल करून संघाचा २-० असा विजय निश्चित केला. उद्या अंतिम सामन्यानंतर बक्षिस वितरण होणार असल्याचे युनायटेडचे अध्यक्ष डॉ रविद्र हत्तरकी, उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी सांगितले.  

 

उद्याचे सामने


एफसी गोवा अँकाडमी वि. केरळ एजी क्लब दु. १.३० वा.

मुंबई महाराष्ट्र पोलीस वि. बडोदा बँक दु. ३ वा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.