Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील फुटबॉल स्पर्धेत बेळगाव, काळभैरवची विजयी सलामी

युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ


सोलापूर, मिरज संघावर सहज मात




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बेळगाव दर्शन युनायटेड, स्थानिक काळभैरी रोड फुटबॉल क्लब (केबीआऱ) यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. त्यांनी अनुक्रमे  मिरजेचा जेएफसी संघ, सोलापूरचा एसएसएसआयला सहज मात केली. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत एम. आऱ. हायस्कुलच्या मैदानावर आजपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला.




दुपारी जेष्ठ फुटबॉलपटू ॲड. सदाशिव हंजी, मारूती लोहार, डॉ सुरेश संकेश्र्वरी, अर्जून चौगुले, बसवराज तुरबतमठ, महादेव पाटील यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी रवळनाथ हौसींग फायनान्सच्या उपाध्यक्ष मीना रिंगणे, उमा बोरगल्ली, महेश मजती, पंडित जोशी, अनंत कुलकर्णी, प्रविण रेंदाळे, जालिंदर शिंदे, संभाजी शिवारे, मल्लिकार्जून बेल्लद, प्रशांत दड्डीकर, तुषार विचारे उपस्थित होते.



युनायटेडचे अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी यांनी स्वागत केले. सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. उपाध्यक्ष सुरेश कोळकी यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात दोन सामने झाले.




पहिल्या सामन्यात केबीआरने सोलापूरचा ३-० असा सहज पराभव केला. तिस-याच मिनिटाला ओंकार बेळगुंदकरच्या पासवर अक्षय होडगेने गोल करून संघाचे खाते उघडले. पाठोपाठ रोहित सुतारचा चांगला प्रयत्न सोलापूरच्या गोलरक्षकाने हाणून पाडला. उत्तरार्धात प्रविण पाटीलने दिलेल्या पासवर मदन पावलेने हेडव्दार गोलकरून आघाडी २-० अशी भक्कम केली. साठव्या मिनिटाला अक्षयने आपला वैयक्तीक दुसरा तर संघाची तिसरा गोल करून विजय निश्चित केल्याने समर्थकांनी जल्लोष केला. दुसऱ्या सामन्यात बेळगावच्या दर्शनने मिरजेवर ३-० अशी मात केली. सातव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर निखील नेसरीकरने गोल करून विजयाचा श्रीगेणशा केला. एकविसाव्या मिनिटाला जयेश सांबरेकरने मैदानी गोल करून आघाडी दोन गोलनी वाढवली. उत्तरार्धातही मिरजेला सुर न सापडल्याने बेळगावच्या सुदर्शन चौगुलेने गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले.


गडहिंग्लज : युनायटेड फुटबॉल स्पर्धेचे फुटबॉलला किक मारून उदघाटन करताना सदाशिव हंजी. सोबत मीना रिंगणे, महेश मजती, रविंद्र हत्तरगी, सुरेश कोळकी, प्रविण रेंदाळे आदी. 


सामनावीर, लढवय्या खेळाडू


आजच्या सामन्यातून अक्षय होडगे ( केबीआऱ), जयेश सांब्रेकर ( बेळगाव) यांना सामनावीर तर सोलापूरचा सोफियान शेख  आणि प्रथमेश मोहिते ( मिरज) यांना लढवय्या खेळाडू म्हणून क्रीडासाहित्य देऊन गौरविण्यात आले.


अर्धशतकाच्या आठवणींना उजाळा


स्पर्धेच्या उदघाटनासाठी आलेल्या अजित क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू हंजी, लोहार, संकेश्र्वरी तर तालुका असोसिएशनचे अर्जून चौगुले, महादेव पाटील, सॉकर असोसिएशनचे बसवराज तुरबतमठ यांनी अर्धशतका पुर्वीच्या आठवणीं उपस्थितांना सांगुन उजाळा दिला.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.