न्यू होरायझन स्कूल विजेता तर फादर एग्नल स्कूल उपविजेता
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळ संचलित औरनाळ येथील न्यू होरायझन स्कूल येथे 'स्पूर्ती २०२४' क्रिडामहोत्सव उत्साहात पार पाडला.
सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी, सर्वोदय पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुमय्या खलिफा, साई इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता नागराळे व फादर एग्नल स्कूल चंदगडचे मुख्याध्यापक फादर संतोष डिसुजा व फादर विल्सन पॉल, न्यू होरायझन स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता पाटील, जागृती प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, शिशू गटाच्या मुख्याध्यापिका सौ. मॅग्देलीन डायस, डॉ. श्याम सागर, डॉ. सौ सुरेखा पाटोळे, अरुण उबाळे उपस्थित होते.
या महोत्सवात विविध सांघिक, वैयक्तिक खेळ तसेच बौद्धिक गुणवत्तेवर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये एकुण चार शाळांचा सहभाग होता. यामध्ये फादर एग्नल स्कूल चंदगड, सर्वोदय विवेक जीवन विदया पब्लिक स्कूल, गडहिंग्लज, साई इंटरनॅशनल स्कूल गडहिंग्लज व न्यू होरायझन स्कूल गडहिंग्लज या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह वाखणण्यासारखा होता.
या महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, संस्थेचे संचालक ॲड. विकास पाटील, बाबुराव भोसक, डॉ. मंजुषा देशपांडे, डॉ. स्वाती कमल, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, रेफरी यांच्या हस्ते विदयार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण करण्यात आले.
या किडा महोत्सवात न्यू होरायझन स्कूलने चॅम्पिअनशिप मिळवून शाळेच्या प्रतिष्ठेत मानाचा तुरा रोवला. उपविजेता फादर एग्नल स्कूल, चंदगड यांना मिळाले तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर सर्वोदय स्कूल व साई इंटरनॅशनल स्कूल यांना समाधान मानावे लागले. या क्रीडा महोत्सवासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता पाटील यांची विशेष प्रेरणा मिळाली. क्रिडा शिक्षक अनिल चौगले यांचे मार्गदर्शन तर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.


