Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सर्व शक्ती पणाला लावा, ताबडतोब 'त्या' नराधमाला पकडा!

आमदार हसन मुश्रीफ यांनी दिल्या गडहिंग्लज पोलीस निरीक्षकांना सूचना 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथे एका परप्रांतीयाकडून अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांनी तातडीने लक्ष घालत गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत त्या नराधमाला तातडीने पकडण्याच्या सूचना केल्या आहेत.



गडहिंग्लज पोलिसांनी सर्व शक्ती पणाला लावून त्या नराधमाच्या मुसक्या आवळाव्यात अशी थेट सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी पोलीस निरीक्षक श्री. होडकर यांना केली आहे. पोलीस यंत्रणेकडून तपास वेगाने सुरू असून संबंधित संशियताचा माग काढण्यात आला असून मोबाईल बंद असल्याने काही अडचणी येत असल्याचे पोलीस निरीक्षक श्री. होडकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.