Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज, भडगाव येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ) वतीने प्रतिमा पूजन करून गडहिंग्लज व भडगाव येथे अभिवादन करण्यात आले. 



गडहिंग्लज येथे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, प्रभारी शहर प्रमुख प्रकाश रावळ, माजी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भडगाव येथेही प्रतिमापूजन 



भडगाव येथे सुभाष स्वामी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, विभागप्रमुख मलापा चौगुले, युवासेना उपतालुकाप्रमुख विशाल चव्हाण, साईनाथ जंगली, दिपक नाईक, शेवंता नाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.