Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसन मुश्रीफ व राजेश पाटील हे दोघेही महायुतीचे तगडे, अनुभवी उमेदवार ; त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेत घालवली!

ज्येष्ठ अभिनेते व महायुतीचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन 


महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ  व राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लजला तुफान गर्दीत जाहीर प्रचार सभा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ तर चंदगड विधानसभा मतदार संघात राजेश पाटील दोघेही महायुतीचे उमेदवार अनुभवी, तगडे आहेत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवा करण्यासाठी घालवले आहे. या संपूर्ण मतदारसंघामध्ये मोलाचे कार्य आहे. दोघेही निवडून तर येणारच आहेत पण जास्त मताधिक्याने कसे विजयी होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. खासकरून माताभगींनी काळजी घ्या, घरातील सर्वांची, आजूबाजूची मते या दोघांना कशी पडतील यासाठी प्रयत्न करा. घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून या दोघांना विजयी करा, असे आवाहन अभिनेते व महायुतीचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे यांनी केले.



गडहिंग्लज येथे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ना. हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज येथे काल जाहीर प्रचार सभा पार पडली. तुफान गर्दीत मोठ्या उत्स्फूर्तपणे ही सभा झाली.



'त्या' लोकांना चंदगडचा बिहार करायचा आहे : आमदार राजेश पाटील 



आमदार राजेश पाटील म्हणाले, चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण भाईगिरी करतय, कोण म्हणतय मी ताईगिरी करणार. या लोकांना चंदगडचा बिहार करायचा आहे. मतदारसंघाचे शांततापूर्ण वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांना वेळीच आवर घाला. उपमुख्यमंत्री अजित दादांना ताकद देण्यासाठी गडहिंग्लजवासीयांनो आम्हाला साथ द्या आणि महायुतीला विजयी करा,असे आवाहन त्यांनी केले.


बिनबुडाचे आरोप करून जनतेची फसवणुक करण्याचे काम विरोधकांकडून सुरू : ना. हसन मुश्रीफ 



ना. हसन मुश्रीफ म्हणाले, कधी केली नाही पंढरीची वारी आणि म्हणतोय रामकृष्ण हरी. बिनबुडाचे, खोटे नाटे आरोप करून जनतेची फसवणुक करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. ज्या थाळीमध्ये खाल्ले त्या थाळीमध्येच घाण केली. आता पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत, तिथेही घाणच करतील. ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेची चौकशी लावून वृद्ध, दिव्यांग, विधवा, परितक्त्या निराधार लाभार्थ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले, त्याला खड्यासारखे बाजूला करा. मला आणि राजेश पाटील यांना पुन्हा संधी द्या,आम्ही तुमचे सेवेकरी बनून काम करू, अशी साद त्यांनी घातली.



यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्डयानावर, माजी आमदार संजयबाबा घाटगे, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, विजय काळे, सिद्धार्थ बन्ने, दत्ताजीराव देसाई, मधुकर पाटील, राजेंद्र तारळे, संदीप नाथबुवा, किरणराव कदम, गुंडूराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.



यावेळी संग्रामसिंह कुपेकर, परशुराम तावरे, राजेंद्र तारळे, सतीश पाटील, प्रकाश पताडे, संतोष पाटील आदींसह महायुतीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.