Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण, लाडकी बहीण योजना कोणी आणली हे सर्वांना माहित आहे : आमदार राजेश पाटील

नंदनवाड येथील जाहीर प्रचार सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 


आमदार राजेश पाटील यांच्याकडून  मतदारसंघात सर्वाधिक विकास कामे : संग्रामसिंह कुपेकर 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): काहीजण अपक्ष उभे राहून भाजपचा पाठिंबा आहे असे लोकांना भासवत आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्हीच आणली म्हणून सांगत आहेत. महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण आहे, लाडकी बहीण योजना कोणी आणली हे सर्वांना ज्ञात आहे. आणखीन एक गृहस्थ उचंगी धरण प्रकल्प आम्हीच केला म्हणून सांगत आहेत. उचंगी धरण कुणी पूर्णत्वास आणला हे जनतेला माहिती आहे.अशा फसव्या लोकांना वेळीच आवर घाला. येत्या २० तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीचा उमेदवार विजयी करा असे आवाहन महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी केले.



नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना भाजपचे नेते संग्रामसिंह कुपेकर म्हणाले, आमदार राजेश पाटील यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केलेली आहे, त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करा असे आवाहन केले.



यावेळी जिल्हा बँकेचे संचालक  संतोष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, संजय कांबळे, एन.डी. कांबळे, विजय शेरवी, सामाजिक कार्यकर्ते दीपक पुजारी, दिनकर पुजारी, महादेव पवार, कृष्णा मगदूम, सुरेश जाधव, सुरेश वाडकर, नारायण हसुरकर, रमेश सावकार, सातवा जाधव, संतोष जाधव, नारायण पाटील, तात्यासो देसाई , मोहन गोसावी, बसवराज सुतार, राहुल बिरंजे, सौरभ जाधव, बाळू वाडकर आदींसह गावातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.