Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये 'घर घर संविधान' उपक्रमानिमित्त पोस्टर्स स्पर्धा

26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना वाहिली आदरांजली




गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी 'घर घर संविधान' साजरा येत आहे. त्याअनुषंगाने भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता तसेच संविधानाची मूल्ये देशाचे भावी नागरिक म्हणून शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये रुजवी यासाठी संविधान दिन करण्यात आला. 


संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे. जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.  राष्ट्रगीतानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे पठण सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंदानी केले. 



यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे, संविधान प्रतीचे पूजन प्राचार्य आर.एस. पाटील व प्रा. एस. एम. वडर यांनी केले. पूजा कोळी यांनी संविधानाची माहिती दिली.



कु. वैष्णवी बोणी यांनी 26/11 दहशतवादी हल्ला दिवसाच्या स्मृती भाषणातून व्यक्त केल्या. प्रिती गुरव यांनी संविधानाविषयी कवितेचे वाचन केले. स्नेहा कांबळे यांनी संविधान - निर्मिती प्रक्रियेविषयी प्रश्नोत्तरे विचारली. विद्यार्थ्यांनी घर घर संविधान' विषयावर सुंदर पोस्टर्स बनविले. कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षिकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. डी. एस. बंदी यांनी केले. आभार  एस. बी. पाटील यांनी मानले.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.