Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकुड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद ; 120 जणांनी घेतला लाभ

नरेवाडीतील संगोपन हॉस्पिटल, नौकुड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन  

 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुड (ता. गडहिंग्लज) येथील सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या पुढाकाराने, ग्रामपंचायत व नरेवाडी येथील संगोपन हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने गावातील सर्व गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा 120   जणांनी लाभ घेतला.



प्रारंभी सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी संगोपन हॉस्पिटलच्या टीमचे स्वागत केले. यामध्ये डॉ.अनुराधा सावंत, निलम इक्के, प्रज्ञा चुगडी,ऋतुजा चौगुले ,तनुजा सिस्टर, निलम, सांबरेकर, ओमकार काविलकर,शैलेश पाटील यांचा समावेश होता.




तसेच सदर आरोग्य तपासणी शिबिर हे मोफत असून गावातील गरजू लोकांनी गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. गावातील लोकांची मोफत आरोग्य तपासणी व्हावी व सर्व गरजू लोकांना वयस्कर,  या शिबिराचा फायदा व्हावा. या दृष्टीने ही शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे सरपंच श्री. चोथे यांनी सांगितले.



या शिबिरामध्ये मोफत उपचार करून, मोफत औषध दिली गेली. या शिबिरात हृदय विकार, मेंदू विकार, फुफ्फुसाचे विकार, दमा, सर्दी, जुनार खोकला तसेच लहान मुलांचे सर्व आजार, स्त्रियांचे सर्व आजार, पोटाचे विकार, मूत्र विकार, हाडांचे विकार, मुतखडा, प्रोस्टेट, अपेंडीक्स, हर्निया, थायरॉईड, बी.पी., मधुमेह (शुगर) तसेच इतर सर्व आजारांवर मोफत तपासणी व औषध दिली गेली. त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.