गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे कोल्हापूर येथील शाहुपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर हे रुजू झाले. त्यांचे विविध मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले,महाराष्ट्र प्रदेश भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, माजी नगरसेवक इंजिनिअर चंद्रकांत सावंत, श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष व लाल आखाडा तालीम मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य आनंद पेडणेकर, शिवसेना ( शिंदे गट) शहर अध्यक्ष वसंत शेटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

