गडहिंग्लज (प्रतिनिधी): केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसद अधिवेशनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गडहिंग्लज येथे शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने निदर्शने करण्यात आली.
येथील दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अमित शहांचा धिक्कार असो, भारतीय संविधानाचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख दिलीपराव माने, अजित खोत, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शहर प्रमुख प्रकाश रावळ, उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, श्रीशैलाप्पा साखरे, मनीष हावळ, महिला तालुकाप्रमुख स्नेहल पाटील, बाळू कुंभार, अनिल खानाई, संभाजी यरुडकर, संदीप चव्हाण, कृष्णात कांबळे, अनिल पोटजाळे, संकेत रावण, विशाल पाटील, उदय गोरुले, कमलेश गोरुले, सुरेश हेब्बाळे, दिगंबर पाटील, विलास यमाटे, संजय पाटील, हरिभाऊ कांबळे, संदीप बामणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

