Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुंडगेच्या दीप इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 'क्वीझ कॉंपिटिशन स्पर्धा' उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): अऩमोल चॅरिटेबल ट्रस्टच्या दीप इंग्लिश मीडीयम स्कूल, दुंडगे येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा पार पडल्या.



पहिल्या दिवशी क्वीझ कॉंपिटेशन स्पर्धा झाल्या. या स्पर्धेला विद्यार्थी आणि शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची ग्रीन, रेड, ब्लू,  यलो अशा चार गटात क्वीझ कॉंपिटिशन स्पर्धा झाली.  ग्रीन ग्रुपने प्रथम क्रमांक, रेड ग्रुपने द्वितीय क्रमांक, तर ब्लू ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवला. ग्रीन ग्रुपमध्ये सुशांत नाईक (10 वी), अर्थव येजरे (10 वी), स्नेहा मुळीक (10 वी), राधिका नांगनुरे ( 9वी),  रेड ग्रुपमध्ये अभिराज पाटील (10 वी), सईनयना चौगुले (9 वी), संस्कृती शिरतोडे (9 वी), श्रेयस धनावडे (9 वी), ब्लू ग्रुपमध्ये सुमन गवळी (10 वी), अनिरुद्ध जामगी (10 वी), वैभवी कणकणवाडी (9 वी), ओमकार जरळी (9 वी) यांचा समावेश होता.



स्पर्धा संस्थाध्यक्ष प्रा. अनिता  चौगुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यावेळी मुख्याध्यापक अजित दावणे, मुख्याध्यापिका विद्या कांबळे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.