गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज नजीक शेंद्री रोडवर अचानक कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात कार पलटी झाली. या अपघातात सदर वाहनातील चालक जखमी असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.


