Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पी.सी.पाटील गुरुजी शिक्षक पतसंस्थेमार्फत उद्या पाचवी शिष्यवृत्ती सराव चाचणी

शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका पंचायत समिती शिक्षण विभागाकडे सुपूर्द 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): पी.सी.पाटील गुरुजी शिक्षक पतसंस्थेमार्फत इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती सराव चाचणी उद्या सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गटविकास अधिकारी संतोष नागटिळक व गटशिक्षण अधिकारी नवलकुमार हालबागोळ यांचेकडे सुपूर्द करण्यात आली.




यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्यासाठी पी.सी. पाटील गुरुजी पतसंस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रमाचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक व गटशिक्षण अधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी कौतुक केले.



यावेळी शिक्षकनेते मधुकर येसणे, संभाजी जाधव, शिक्षक बँक संचालक नंदकुमार वाईंगडे, पी.सी.पाटील गुरुजी पतसंस्था सभापती उत्तम यमगेकर, विस्तार अधिकारी राजन द्ड्डीकर, केंद्रप्रमुख कल्पना येसणे,  चंद्रकांत जोशी, शिक्षक संघ अध्यक्ष अनिल बागडी, शिक्षणमंच अध्यक्ष सचिन पाटील, भरत शेळके, कार्याध्यक्ष काशिनाथ साखरे, संचालक आनंदा आजगेकर, विष्णू कुराडे, दिलीप पाटील, मारुती कोलुनकर, संघटना सरचिटणीस व संचालक आयाज बागवान, संचालक विजय शिंदे कार्याध्यक्ष शरद देसाई उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.