Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुलला विजेतेपद

आंतर अकादमी आंतरराज्य स्पर्धा


बेळगाव मानस फौंडेशन उपविजेता; मॅजिक चतुर्थ





गडहिंग्लज (प्रतिनिधी):  पिछाडीवरून येत जिगरबाज खेळ करून स्थानिक गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुल ‘अ’ संघाने बेळगावच्या मानस स्पोर्टस फौंडेशनला ३-१ असे नमवून विजेतेपद पटकाविले. युनायटे स्कुल ‘ब’ संघाने बेळगावच्याच मँजिक स्पोर्टिंगला सडनडेथवर ७-६ असे हरवून तिसरा क्रमांक मिळविला. युनायटेडचा धीरज कुरबेट्टीने स्पर्धावीरचा बहुमान पटकावला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत गेले दोन दिवस एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर हि पंधरा वर्षाखालील आंतर अकादमी आंतरराज्य फुटबॉल स्पर्धा सुरु होती.



अंतिम सामन्यात पाचव्याच मिनिटाला मानस स्पोर्टसच्या अरजान बडेघोलने युनायटेड स्कुल ‘अ’च्या बचावपटूतील गोंधळातील फायदा उठवत पहिला गोल करून खळबळ माजवली. त्यानंतर युनायटेडने अधिक सुत्रबध्द खेळ करत चढाया वाढविल्या. अठराव्या मिनिटाला युनायटेडच्या आलोक पाटीलने मैदानी गोल करून बरोबरी साधली. मध्यतरानंतर युनायटेडचे वर्चस्व कायम राखत ४० व्या मिनिटाला स्वरुप शेटकेने संघाचा दुसरा गोल करून आघाडी २-१ अशी वाढवली. शेवटच्या टप्प्यात धीरज कुरबेट्टीने तिसरा गोल करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, तिस-या क्रमांकाच्या लढतीत निर्धारित वेळेत १-१ तर टायब्रेकरमध्ये ४-४ बरोबरीत सामन्यात युनायटेड स्कूल ब संघाने मँजिकवर ७-६ अशी मात केली.




विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अऱविंद कित्तुरकर, अभियंता दयानंद परमणे, दिपक मोहिते, उद्योजक तुषार विचारे यांच्या हस्ते विजेत्यांनी बक्षिसे देण्यात आली. यावेळी अमृत महोत्सवी वर्षानिमित्य श्री कित्तुरकर, समन्वयक सुरज हनिमनाळे यांचा सत्कार झाला. युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी, संचालक संभाजी शिवारे, प्रशांत हिरेमठ, अनिल कोले, यासीन नदाफ, सुल्तान शेख यांच्यासह खेळाडू, पालक, प्रशिक्षक उपस्थित होते. स्पर्धा संयोजक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. आदर्श दळवी यांनी आभार मानले. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले.



 

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट...


स्पर्धा वीर धीरज कुरबेट्टी (युनायटेड स्कुल अ)

गोलरक्षक – हसनेन नालबंद (मॅजिक बेळगाव)

बचावपटू- सुमित पनोरी ( युनायटेड स्कुल ब)

मध्यरक्षक – रियान पटवेगार ( बेळगाव मानस स्पोटस्)

आघाडीपटू- आलोक पाटील ( युनायटेड स्कुल अ)     




                                                                                            
                   

खेळाडूंना शपथ

स्पर्धेचे वयचोरी विरुध्द लढा हे घोषवाक्य होते. वयचोरीच्या किडीमुळे क्रीडाक्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. त्याकरीता प्रबोधन या स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आले. गडहिंग्लज, बेळगाव, सोलापूर, मिरज येथील खेळाडूंना वयचोरी टाळण्याची आणि खऱ्या जन्मतारखेसह स्पर्धेत खिलाडूवृत्तीने सहभागी होण्याची शपथ देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.