Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साधना प्रशालेच्या क्रीडा महोत्सवाचा रिले स्पर्धेने समारोप, लवकरच बक्षीस वितरण



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना प्रशालेतील क्रीडा महोत्सवाचा रिले स्पर्धेने समारोप झाला.



साधना प्रशालेचा क्रीडा महोत्सव 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे बक्षीस वितरण लवकरच होणार आहे. यामध्ये कबड्डी, खो-खो, गोळा फेक, थाळीफेक, रनिंग, उंच उडी, लांब उडी, रिले आदींचा समावेश होता. 

 


प्रशालेचे प्राचार्य आय. पी. कुटिन्हो व पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले . क्रीडा शिक्षक विनय नाईक, बी. एन. वाघमारे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.