फार्मसी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी : सचिन कुंभोजे
कोल्हापूर : येथील श्री प्रिन्स मराठा बोर्डिंग हाऊस सचलित, न्यू वूमन्स फार्मसीमध्ये डी फार्मसीच्या नवोदित विद्यार्थीनींचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला छ.शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य रविंद्र कुंभार यांनी महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षणसंस्था पुरस्कार प्राप्त १०४ वर्षांचा इतिहास असलेल्या संस्थेचा व महाविद्यालयाचा परिचय उपस्थित पालक व विद्यार्थीनींना करून देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिरी चे डायरेक्टर सचिन कुंभोजे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, तरूणपिढी ही आधुनिक भारताचे भविष्य आहे. जीवनात संघर्ष असतो. परंतु जिद्द असल्यास यशाकडे निश्चितच जाता येते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात मात्र सतत शिकत राहा. फार्मसी क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी आहेत असे नमूद केले. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ.के.जी.पाटील यांनी नवोदित विद्यार्थीनींना शुभेच्छा दिल्या व संस्था गुणवत्तेच्या बाबतीत नेहमी अग्रेसर राहील. सोयी- सुविधांच्या बाबतीत कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.
संस्थेचे संचालक विनय पाटील यांनी विद्यार्थ्यांना संशोधन तसेच आधुनिक औषधे त्याचा सुयोग्य वापर व प्रामाणिकपणे या क्षेत्रात कामगिरी करावे असे नमूद केले. संस्थेचे विकास अधिकारी डॉ.संजय दाभोळे यांनी विद्यार्थीनींना डी फार्म वरच न थांबता उच्च शिक्षण घ्यावे व वेगवेगळ्या उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेवून त्यामध्ये अग्रेसर कामगिरी करावे असे मनोगतात व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष बी.जी.बोराडे यांनी फार्मसी क्षेत्र व समाज यांचे जवळचे नाते असून व्यवसाय, नोकरी, संशोधन करताना विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे व सचोटीने त्यामध्ये उतरावे असे नमूद केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे व्हा.चेअरमन डी.जी. किल्लेदार तसेच संचालक वाय. एल.खाडे, आर.डी.पाटील, सी.आर.गोडसे, पी.सी.पाटील, सेक्रेटरी संभाजी मेटील, न्यू फार्मसीचे प्राचार्य डॉ. सचिन पिशवीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.निकिता शेट्टे व प्रा.सविता म्हाळुंगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. वैष्णवी निवेकर, प्रा.पियुषा नेजदार व प्रा.दिव्या शिर्के यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी संख्येने उपस्थित होते.




