Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजच्या शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज कोलेज ऑफ फार्मसीमध्ये इंडक्शन प्रोप्रेम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वराज मल्टीस्पेशालिटीचे डॉ. अजित पाटोळे व उद्योजिका सौ. शर्वरी पवार उपस्थित तर अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे होते.



प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. किरण जाधव यांनी केले. प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा मुख्य हेतू स्पष्ट करताना जन्मापासून मृत्युपर्यंत औषधांची गरज असते. त्यामुळे हे क्षेत्र सतत कार्यरत असते, फार्मसीमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच फार्मसीमध्ये करिर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात असणाऱ्या संधीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.




स्वराज मल्टीस्पेशालिटीचे डॉ. अजित पाटोळे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये औषधनिर्माण शाखा हे अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात सेवाभावी कार्याची खरी प्रचिती येत असते. याचे महत्व कोरोना काळात सर्वांना कळाले आहे. कोरोना काळात फार्मासिस्ट लोकांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी आरोग्य सेवेतून समाजासाठी दिलेले योगदान कोणीच विसरू शकत नाही. अशा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्तीने आपले जीवन घडवण्याचा ध्यास घेणे गरजेचे आहे. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांनी फार्मसीच्या क्षेत्रात शिवराज नेहमीच सर्वतोपरी मदत करण्यास प्रयत्नशील आहे. संस्थेच्या माध्यमातून फार्मसीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगले करिअर घडविण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील असे स्पष्ट केले.



यावेळी प्रा. मनीषा जाधव यांनी डी. फार्मसी तर प्रा. शुभम जाधव यांनी बी. फार्मसीच्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. प्रा. सुप्रिया पन्हाळे व प्रा.पूजा गुरव यांनी कार्यक्रमाचे संयोजन यांनी केले. यावेळी पालक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, फार्मसीचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण जाधव यांनी केले. तर आभार प्रा. पूजा गुरव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.