Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लेफ्टनंट पृथ्वीराज पाटील यांचे गडहिंग्लजमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत

शासकीय अधिकारी, आजी-माजी सैनिक संघटना, विविध समाजाच्या वतीने सत्कार 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड झालेल्या गडहिंग्लज येथील पृथ्वीराज युवराज पाटील यांचे गडहिंग्लजमध्ये जल्लोषात स्वागत व सत्कार सोहळा पार पाडला.



स्वागत रॅलीची सुरुवात येथील दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाला बेलबाग येथील महंत सिद्धेश्वर स्वामीजी व पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर स्वागत रॅली मुख्य रस्त्यावरून श्री बसवेश्वर महाराज स्मारक, शिवाजी चौक यामार्गे नदीवेस येथे पोहोचल्यानंतर पाटील समाजातर्फे अध्यक्ष बी.बी.पाटील व मान्यवरांच्या हस्ते पृथ्वीराज यांचा सत्कार करण्यात आला.



त्यानंतर उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, ॲड. सुनील तेली  यांनी पृथ्वीराज यांना  शुभेच्छा दिल्या. आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित-जय जवान जय किसान फौंडेशन गडहिंग्लजच्या वतीने अध्यक्ष कुमार पाटील व पदाधिकारी यांच्या हस्ते देखील सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक, फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.