Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फुटबॉल स्पर्धेत शिवराज इंग्लिश स्कुलला विजेतेपद

डॉ. घाळी फुटबॉल लीग : केदारी रेडेकर इंग्लिश स्कुलला उपविजेतेपद


समीर मणेर ठरला स्पर्धावीर


गडहिंग्लज : डॉ. घाळी लीग विजेत्या शिवराज स्कुलला पारितोषिक देताना गजेंद्र बंदी. सोबत संभाजी शिवारे, संजय घाळी, सुरेश कोळकी, कावेरी चौगुले, संयोजक दिपक कुपन्नावर आदी.                 (छायाचित्र : आशपाक किल्लेदार) 


गडहिंग्लज (प्रतिनिधी) : डॉ घाळी शालेय फुटबॉल स्पर्धेत चौदा वर्षाखालील गटात शिवराज इंग्लिश स्कुलने केदारी रेडेकर पब्लिक स्कुलचा ५-१ असा सहज पराभव करून विजेतेपद पटकाविले. शिवराजचा समीर मणेर स्पर्धावीरचा बहुमान पटकावला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत गेला महिनाभर सुरु असलेल्या या स्पर्धेत दहा संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे यंदाचे २५ वे वर्ष होते.




अंतिम सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला रेडेकर स्कुलच्या बचावपटूने गोलक्षेत्रात चेंडू हाताळल्याने मिळालेल्या पेनल्टीवर शिवराजच्या आलोक पाटीलने गोल करून खाते उघडले. त्यानंतर विश्वास दुणावलेला शिवराजच्या आलोकने अधिक आक्रमक खेळ करत गोलचा सपाटा लावला. सहाव्या, दहाव्या, चौदाव्या, अठराव्या मिनिटाला पाच गोल करत रेडेकर संघाला हैराण केले. तुलनेत उत्तरार्धात रेडेकर स्कुलने इर्ष्येने खेळ केला. रेडेकरच्या वेदांत मानेने गोल करून सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला.पण, शिवराजने भक्कम बचाव ठेवून विजेतेपद साकारले.



विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव गजेंद्र बंदी, युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी, माजी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्याहस्ते विजेते, उपविजेत्यांचा ढाल आणि क्रिडा साहित्य देऊन गौरव झाला. स्पर्धा समन्वयक सक्षम तोंदले, अवधुत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा संयोजक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. यावेळी युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे, संजय घाळी, प्रशांत दड्डीकर, तानाजी देवेकर, ओमकार जाधव, सौरभ जाधव यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक उपस्थित होते. मनिष कोले यांनी आभार मानले.


स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट


स्पर्धावीर : समीर मणेर (शिवराज)

गोलरक्षक : समर्थ शेटके (शिवराज)

बचावपटू: आदित्य पाटील (केदारी रेडेकर)

मध्यरक्षक  : प्रणित घोडके ( जागृती)

आघाडीपटू : अभिषेक सासने ( शिवाजी)




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.