विद्यार्थ्यांनी मांडले सुमारे 65 स्टॉल
सर्वांना मिळाली रुचकर मेजवानी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना प्रशालेत खाद्य महोत्सव उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, उद्योग जगताची ओळख व्हावी यासाठी प्रशालेत खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या खाद्य महोत्सवाला सर्वांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रशालेचे प्राचार्य आय.पी.कुटीन्हो पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर, संचालिका सौ.फिलॉन बारदेस्कर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. या खाद्य महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी 65 स्टॉल उभारले होते. यामध्ये घरगुती पद्धतीने तयार केलेली खीर, मोदक, गुलाबजामून इडली, सँडविच, शेवपुरी, पाणीपुरी, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, चिकन ६५, भेळ, गोबी मंचुरियन, फराळाचे पदार्थ, पोहे, केक, बटाटा वडा, भजी इत्यादी रुचकर पदार्थ या स्टॉलवर ठेवण्यात आले होते.
या खाद्य महोत्सवाचे नियोजन सतीश कांबळे, अमोल शेडबाळे, श्रीमती शितल भवारी, सौ. सारिका देसाई यांनी केले. सदर महोत्सवाचे परीक्षण ए.जे.बारदेस्कर, व्ही. आर. नाईक, शितल हरळीकर यांनी केले.
या स्पर्धेत क्रमांक मिळवलेले विद्यार्थी खालील प्रमाणे -
व्हेज.....
1 कुमार -फैज नदाफ (साउथ इंडियन थाळी )
2 कुमार -ओमकार करडी (फालुदा )
3 कुमारी- एलिना पटेल (मावा फ्रुट कस्टर्ड )
4 कुमार- शौर्य पाटील (फ्रुटखंड )
5 कुमारी -आराध्या पवार ( दाबेली)
नॉनव्हेज.....
1 कुमारी- स्वरा सोरटे (चिकन बिर्याणी )
2 कुमारी- सोफिया अत्तार (चिकन दम बिर्याणी )
3 कुमार -अमनउल्ला बोजगर ( फिश फ्राय )
4 कुमार -तन्मय चव्हाण ( चिकन चायना टाऊन )
सदर खाद्य महोत्सवात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या खाद्य महोत्सवाला सर्वांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक झाले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



