Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साधना प्रशालेत पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

'आदर्श विद्यार्थी पुरस्कार' कनिष्क बेल्लद याला 


'जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी' 'ब्ल्यू हाऊस' ने पटकावली 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना प्रशालेत पार पडलेल्या क्रीडा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम शनिवारी  पार पडला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य आय.पी. कुटीन्हो यांनी केले. या प्रसंगी प्रशालेचा विद्यार्थी प्रतिनिधी कनिष्क बेल्लद, आदित्य पवार व विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रेया कोकितकर व आयेशा हलकर्णी, प्रशालेचे माजी विद्यार्थी तौसीफ जमादार, निनाब बारदेस्कर, निशा कोळकी, प्रमुख पाहुणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील, जलसंधारण विभागाचे निवृत्त इंजिनियर के. एस. बारदेस्कर, टी. के. एम. ए. वारणानगरचे प्राचार्य टी.बी.  ऱ्हाटवळ, सुनील चौगुले फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती कावेरी चौगुले, संस्था अध्यक्ष चंद्रकांत गुजर, सचिव जे. बी.  बारदेस्कर ,संचालक  ए. जे.  बारदेस्कर, साधना प्रशालेचे  माजी प्राचार्य आर. एन. पटेल यांची एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्ड परीक्षा परिषदेत अशासकीय सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल, प्रशालेचे सहाय्यक शिक्षक जोसेफ नोरोन्हा यांची इंग्रजी विषयात मुख्य नियंत्रक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.




सत्कारानंतर प्राचार्य आय.पी. कुटीन्हो यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाय. बी. पाटील,  टी.बी. ऱ्हाटवळ, श्रीमती कावेरी चौगुले, जे. बी. बारदेस्कर यांनी मनोगते व्यक्त केली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावर्षीचा 'आदर्श विद्यार्थी पुरस्कार' कनिष्क कांचन  बेल्लद याला मिळाला आणि 'जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी' 'ब्ल्यू हाऊस' ने मिळवली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कांबळे, जॉन्सन  सोज, सौ. के. एन. कोळेकर,  एन. डी . शेख यांनी केले. जोसेफ  नोरोन्हा यांनी आभार मानले.



कार्यक्रमास साधना शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. फिलोन  बारदेस्कर, कॉमर्स विभाग प्रमुख  वैशाली भिऊंगडे,  व्होकेशनल विभाग प्रमुख  अनिल देशमुख, विज्ञान शाखाप्रमुख  आर. डी. लांबोर क्रीडा प्रमुख विनय नाईक, टी. बी. चव्हाण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.