Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाव बंद कडकडीत ; परभणी घटनेचा निषेध



गडहिंग्लज (प्रतिनिधी): परभणी येथे भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळाच्या आवाहनाला व्यापारी, दुकानदार, हॉटेलधारक यांनी प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी होत बंद यशस्वी केला.


     

प्रारंभी सकाळी येथील पाच रस्ता येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर निषेध फेरी काढली. ही फेरी झोकांडे स्टॉप, मरगुबाई मंदिर, नेहरू चौक, महादेव मंदिर, शिवाजी चौक या मार्गावरून काढण्यात आली. त्यानंतर परशुराम तलावाजवळ सभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंच संदिप कोकितकर, नाना कांबळे, किरण कांबळे, नरसिंह गुरव, नारायण कांबळे, बाबराव कोले, दिपक धरणगुत्ती, ईश्वर कांबळे, रविंद्र कांबळे यांनी मनोगतातून या घटनांचा निषेध  केला. गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.