Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज साखर कारखाना कारभाराची सहकार कायद्यान्वये चौकशी करून कायदेशीर कारवाई करा!

गोडसाखर सभासद व सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोत यांची पत्रकार परिषदेत मागणी 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण तृतीय लेखापरीक्षक वर्ग १ यांनी करून १७१ पानांचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात सहकार कायदा कलम ८३ अन्वये तातडीने चौकशी लावण्यात यावी  व ज्यांनी भ्रष्टाचार करून या कारखान्यातून करोडो रुपये लुटले आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप न होता चौकशीअंती जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोडसाखर सभासद व सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, याबाबतचे निवेदन प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना देण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. 



यावेळी बोलताना शिवाजीराव खोत म्हणाले, कारखान्यातील मनमानी, बेकायदेशीर कारभारामुळे सभासदांच्या विश्वासाला तडा गेला आहे. गडहिंग्लज साखर कारखान्यातील प्रत्येक गोष्टीची नैतिक जबाबदारी जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांचीच असून ते त्यांनी मान्य केले पाहिजे. या कारखान्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे मात्र दुर्लक्ष करून बाजू मारली जात असल्याचे सांगितले.



जिल्हा बँकेकडून घेतलेले ९५ कोटी कर्ज व त्याची लावलेली बेकायदेशीर विल्हेवाट याची सहकार कायद्यान्वये चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रादेशिक सहसंचालकांकडे केल्याचे श्री.खोत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला बाळासाहेब लोंढे, सुरेश पाटील, अरुण लोंढे, लक्ष्मण देवार्डे, महादेव मांगले, पांडू कदम, संभा बुगडे, दिनकर खोराटे, शामराव पन्हाळकर, विजय रावण, अशोक कांबळे यांच्यासह सभासद  व सेवानिवृत्त कामगार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.