Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजच्या साधना प्रशालेत हस्तकला व रांगोळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या कलांचे प्रमुख पाहुण्यांकडून कौतुक 


 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना प्रशालेत आयोजित रांगोळी आणि हस्तकला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलांचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले.



गडहिंग्लज : साधना प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली रांगोळी.


या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुण्या  ॲड. सौ. भारती बाजीराव शिंदे  यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, चित्रे व रांगोळी यांचे बारकाईने निरीक्षण करून सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. 'विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासली पाहिजे आणि नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.



हस्तकला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या. त्याचबरोबर कागदी फुले, आकाश कंदील, पेपरवेट, कागदी बॅचेस, वॉलपीस, कापडी पिशव्या, पायपुसणी, शोभेच्या वस्तू, शेडूच्या व मातीच्या वस्तू इत्यादी विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या होत्या. दरम्यान रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कोरोना योद्धा, आकर्षक दीपोत्सव, प्रदूषण विरहित दिवाळी, ऐतिहासिक, वास्तू मुलींचे संरक्षण अशा विविध विषयांवर रांगोळ्या काढल्या होत्या.



अध्यक्षीय मनोगतात प्रशालेचे प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी विद्यार्थ्यांच्या कलांचे कौतुक केले. हस्तकला वस्तू तयार करण्यासाठी शितल भवारी, शितल हरळीकर यांचे मार्गदर्शन तर रांगोळी प्रदर्शन भरवण्यासाठी रमण लोहार, रवींद्र पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास पर्यवेक्षक  ए. जे. बारदेस्कर, संचालिका सौ . फिलॉन बारदेस्कर, व्होकेशनल विभाग प्रमुख अनिल देशमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.