गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील प्रसिद्ध डॉक्टर शशिकांत जाधव यांची कन्या ऋग्वेदा जाधव हिने बृहन्मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. या परीक्षेत तिची प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड झाली आहे. तिला या यशासाठी अभिनव सायन्स अकॅडमी, गडहिंग्लज व डॉ. संजिवनी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

