ग्राहक पंचायतच्या गडहिंग्लज शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दिनांक २४ डिसेंबर 'राष्ट्रीय ग्राहक दिन' व १५ मार्च रोजी 'जागतिक ग्राहक दिन' प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात यावा अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या गडहिंग्लज शाखेच्या वतीने तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.
तसेच या कार्यक्रमात ग्राहकांचे प्रबोधन तसेच ग्राहकांच्या विविध अडचणी व समस्यांचे निरसन करण्यात यावे शिवाय या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद व भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे चंदगड, आजरा, गडहिंग्लज चे विभागीय प्रमुख कॉ. शिवाजी गुरव, आजरा तालुका प्रमुख महादेव सुतार, गडहिंग्लज तालुका पदाधिकारी प्रा.सुरेश वडराळे, महादेव शिंगे, रोहिणीताई चौगुले, मनोहर गोरुले, विठ्ठल चुडाई आदी उपस्थित होते.

