Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत तेरणी मराठी विद्या मंदिर शाळेच्या खेळाडूंचे धवल यश



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी केंद्रशाळा अंतर्गत पार पडलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रिडा स्पर्धेत मराठी विद्या मंदिर तेरणी शाळेने धवल यश संपादन केले. केंद्रस्तरीय स्पर्धेतील सांघिक विभागातील प्रथम व वैयक्तिक विभागातील प्रथम व द्वितीय विजेते खेळाडू तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.



100 मीटर धावणे मोठा गट (मुले) :कौस्तुभ करवीर कतिगार-द्वितीय तर 200मी.धावणेमध्ये कौस्तुभ प्रथम, 400 मी.धावणे-प्रदीप प्रकाश कळविकट्टे-प्रथम, 600 मी.धावणे-रोहीत मल्लिकार्जुन दिंलकुपी-द्वितीय,100×4रिले-कौस्तुभ कतिगार, प्रदीप कळविकट्टे, रोहीत दिंडलकुपी  व विठ्ठल धनगर-द्वितीय, थाळी फेक-आदित्य सावेकर-तृतीय, कुस्ती 45 किलो -विघ्नेश इंगवले-प्रथम.



मोठा गट (मुली) - लांब उडी-करूणा शिवाजी कांबळे-द्वितीय,  100 मी.धावणे- सोनाली करवीर भोई-प्रथम, 200 मी.धावणे-करूणा शिवाजी कांबळे-प्रथम, 600 मी.धावणे-नम्रता अशोक भोई-द्वितीय, 100×4 रिले-करूणा कांबळे, प्रतिक्षा कळविकट्टे,नम्रता भोई, सोनाली भोई-प्रथम, गोळा फेक-प्रतिक्षा पिरसाब कळविकट्टे-प्रथम, थाळी फेक-वल्लरी विलास भोगाणे-प्रथम, कुस्ती 40 किलो -वल्लरी विलास भोगाणे-प्रथम.




लहान गट(मुले) : खो-खो:- प्रथम क्रमांक, कबड्डी :- द्वितीय क्रमांक, 100मी.धावणे-कार्तिक करवीर कतिगार-प्रथम, उंच उडी-आयान ठगरे-तृतीय.


लहान गट (मुली) : 100मी.धावणे- मांजरे-तृतीय, उंच उडी-सायली निंबाळकर-तृतीय, 50 मी.धावणे-अमृता हिरेमठ-तृतीय.



या खेळाडूंना श्रीकांत कल्लोळे, सखरू भोसले, कामाना नाईक, विजय पाटील, बशीर करीमगोळ यांचे मार्गदर्शन तर परशराम गायकवाड, रमजान अंकली व सौ.सुरेखा मगदुम यांची प्रेरणा मिळाली.

     



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.