गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे पोलीस निरीक्षक म्हणून कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांची बदली करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी गजानन सरगर यांची बदली झाल्यानंतर या जागी सतीश होडगर यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र लागलीच दीड महिन्यानंतर श्री होडगर यांची देखील बदली करण्यात आली. आता या जागी कोल्हापुर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

