Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरच्या न्यू वूमन्स फार्मसीमध्ये एचआयव्ही एड्स मार्गदर्शन कार्यशाळा



कोल्हापूर : येथील न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स, युवा ग्रामीण संस्था व राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.




कार्यशाळेची सुरूवात राष्ट्रगीत व रोपट्याला पाणी घालून करण्यात आली. कार्यशाळेच्या सुरूवातीला प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यामागचा उद्देश व एड्स जनजागृती यावर प्राचार्य रविद्र कुंभार यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोहन सातपुते यांनी कार्यशाळेत एचआयव्ही बाबत असलेले समज - गैरसमज, एचआयव्ही होण्याची प्रमुख कारणे, आदींबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले.




यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांनी अशा कार्यशाळेच्या आयोजनाची सध्या गरज असून समाजात आजारांबाबत असलेले समज - गैरसमज, प्रतिबंध यासाठी निश्चितच याचा उपयोग होईल असे नमूद केले.



या कार्यशाळेसाठी रोटरी क्लब ऑफ रॉयल्सच्या सौ. सविता पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. वैष्णवी निवेकर, प्रा. निकिता शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षदा गोसावी,  प्रा. दिव्या शिर्के, प्रा. सविता म्हाळुंगे, गर्ल्स व न्यू वूमन्स च्या विद्यार्थीनीं, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.