Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

येणेचवंडी मराठी विद्या मंदिर शाळेतील क्रिडापट्टूंना स्पोर्ट्स किट वाटप

इचलकरंजीचे उद्योजक युवराज कुराडे व प्राथमिक शिक्षक अनिल कुराडे यांचा स्तुत्य उपक्रम 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): येणेचवंडी येथील मराठी विद्या मंदिर शाळेच्या क्रिडापट्टूंना इचलकरंजीचे उद्योजक युवराज कुराडे व प्राथमिक शिक्षक अनिल कुराडे यांनी ५० स्पोर्टस् किट्स दिले. नूल केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र हुली यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. 



यावेळी देणगीदार अनिल कुराडे व युवराज कुराडे यांचा विद्यामंदिर येणेचवंडी व केंद्रप्रमुख राजेंद्र हुली यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष कुराडे, प्रकाश इंगळे, तानाजी कुराडे, संजय बिरंजे, सरपंच दिपाली कांबळे, राजेंद्र हुली यांनी मनोगते व्यक्त केली. 



प्रास्ताविक मुख्याध्यापक  उत्तम यमगेकर यांनी तर सुत्रसंचालन बामणे मॅडम यांनी केले. यावेळी आनंदा कुराडे, सचिन राऊत, शिवराय हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश चव्हाण, संभाजी कुराडे, अरूणा कुराडे, भारती बामणे यांच्यासह सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार श्री. हिरेमठ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.