Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजी-माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट



ठाणे : आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित-जय जवान जय किसान फौंडेशन, गडहिंग्लजच्या पदाधिकाऱ्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांची ठाणे येथे भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.



काल मुंबई येथील आझाद मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान, चंदगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांची आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित-जय जवान जय किसान फौंडेशन गडहिंग्लज व संपूर्ण तालुक्यातील सेना परिवाराच्या वतीने भेट घेत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 



यावेळी सदस्य पुंडलिक यादगुडे, हरळी खुर्द ग्रामपंचायत सदस्य शशिकांत चौगुले, संघटनेचे अध्यक्ष  अध्यक्ष कुमार पाटील. दिनांक 10 ते 14 डिसेंबरपर्यंत चंदगड विधानसभेच्या जिल्हा परिषद मतदार संघाचा दौरा करणार असल्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.