Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलला विजेतेपद

डॉ. घाळी फुटबॉल लीग : बेळगाव येथील केंद्रीय विद्यालय उपविजेता 


सुशांत शेळके ठरला स्पर्धावीर



गडहिंग्लज : महाराष्ट्र हायस्कुलला विजेतेपदाचे पारितोषिक देताना गजेंद्र बंदी. सोबत संभाजी शिवारे, महेश घाळी, संजय घाळी, मनिष कोले आदी.   (आशपाक किल्लेदार) 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): सतरा वर्षाखालील अंतिम फुटबॉल सामन्यात कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कुलने बेळगावच्या केंद्रीय विद्यालयाला चार गोलनी हरवून विजेतेपदासह डॉ. घाळी ढाल पटकाविला. कोल्हापूरच्या सुशांत शेळकेने बहारदार खेळ करत स्पर्धावीरचा बहूमान मिळविला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे यंदाचे २५ वे वर्ष होते.



सामन्याच्या सुरवातीपासून कोल्हापूरने आक्रमक सफाईदार खेळ केला. तुलनेत केंद्रीय विद्यालयाने धसमुसळे धोरण अंगीकारत कोल्हापूरला हैराण केले. परिणामी, सातत्याने पंचाना सामन्यात हस्तक्षेप करावा लागला. कोल्हापूरच्या इशांत तिवलेने पहिला गोल करून बेळगावला इशारा दिला. उत्तरार्धात अधिक त्वेषाने खेळणाऱ्या महाराष्ट्रच्या इशांतने आपला आणि संघाचा दुसऱ्या गोलने आघाडी दोन गोलनी भक्कम केली. शेवटच्या टप्प्यात मयुर पाटील, प्रतिक पोवारने गोल करून ४-० असा विजय निश्चित केला. बेळगावच्या हर्षल गुरव, अर्थव तांबोळकरचे प्रयत्न अपुरे पडले. विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव गजेंद्र बंदी, महेश घाळी यांच्याहस्ते विजेते आणि उपविजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.



युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे, मनिष कोले, तानाजी देवेकर, संजय घाळी यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. समन्वयक सक्षम तोंदले यांनी स्वागत केले. अवधूत चव्हाण यांनी आभार मानले. दरम्यान, उपांत्य फेरीत महाराष्ट्र हायस्कुलने बेळगावच्या सेंट झेवियर्सचा २-० तर केंद्रीय विद्यालयाने सडनडेथवर स्थानिक न्यू होरायझनचा ४-३ असा पराभर करून अंतिम फेरी गाठली होती.




स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट


स्पर्धावीर- सुशांत शेळके (महाराष्ट्र)

गोलरक्षक- सुमित पाटील (होरायझन)

मध्यरक्षक- हर्षल गुरव ( केंद्रीय विदयालय)

बचावपटू- तेजराज एन. ( सेंट झेवियर्स)

आघाडीपटू- इषांत तिवले (महाराष्ट्र)




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.