Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील फुटबॉल स्पर्धेत साधना, होरायझन, सर्वोदयाची विजयी सलामी

एमआर युनायटेड ट्रॉफी : शिवराज स्कुल, शिवाजी विद्यालयाची दमदार आगेकूच


गडहिंग्लज : तेरा वर्षाखालील शालेय स्पर्धेचे फुटबॉलला किक मारून माधव पोटे- पाटील यांनी उदघाटन केले. (आशपाक किल्लेदार) 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत सुरु झालेल्या एमआर - युनायटेड ट्रॉफी तेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत साधना हायस्कूल, न्यू होरायझन स्कूल, सर्वोदया स्कूल यांनी आपपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. गतविजेता शिवराज स्कूल, छत्रपती शिवाजी विद्यालय यांनी मोठे विजय नोंदवून दमदार आगेकूच कायम ठेवली. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.



एम.आर.हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष बाळ पोटे- पाटील यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उदघाटन केले. प्राचार्य संजय कुंभार, युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे, उत्तम देसाई, सदस्य प्रविण चव्हाण, विश्वनाथ सुतार, शरद आगसगी, सचिन मगदूम, डॉ उदय कोळी यांच्यासह पालक, क्रीडाशिक्षक उपस्थित होते. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. आदर्श दळवी यांनी आभार मानले.


गडहिंग्लज : स्पर्धेची माहिती देताना युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे सचिव दिपक कुपन्नावर.


पहिल्या सामन्यात शिवाजी विद्यालय अ संघाने नवोदित गिजवणे ( माळ मारूती) हायस्कूलचा ५-१ असा पराभव केला. शिवाजीच्या स्वयंम शेटके याने दोन तर सार्थक निकम, सर्वेश बांदेकर, अभिषेक सासणे यांनी प्रत्येकी एक गोल केला. साधना हायस्कुलने एमआर हायस्कुलवर २-० अशी मात केली. साधनाच्या शौर्य मल्हार यांने दोन गोल मारले.



होरायझन स्कूलने वि. दि. शिंदे स्कुलचा ३-१ असा पराजय केला. होराजझनच्या हिरण्य पाटणेने गोलची हैटट्रीक नोंदवली. शिंदेच्या समर्थ मांगचा गोल पराजय टाळू शकला नाही. सर्वोदया स्कूलने जागृती हायस्कूलला ४-० असे हरविले. सर्वोदयाच्या विराज शिंदेने ३ तर समर्थ सुतारने एक गोल केला. शिवराज स्कुलने शिवाजी विदयालय ब संघाला ८ गोलनी सहज पराभव केला. तर गडहिंग्लज हायस्कूलला ३-१ असा पराजय केला. शिवराजच्या सामीण मणेर, असद पठाण, रणवीर कुराडे, तनीष पाटील, फरहाण नदाफ, प्रतिक कांबळे, रणवीर कुराडेस साईराज सासणे, धैर्यशिल वाघ यांनी गोल केले. सागर पोवार, ओमकार सुतार, सुशांत देवार्डे, सोहेल बस्तवडे, ओमकार सांगलीकर, सुरज हनिमनाळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.