पगाराची रक्कम शाळेच्या नावे बँकेत कायमस्वरूपी ठेव ठेवून त्याच्या व्याजातून गुणवंत विद्यार्थी पुरस्कार
दड्डी : मराठी मुलांची शाळा धोंडगट्टे (ता. हुक्केरी) येथील अतिथी शिक्षिका सौ. संध्याराणी विठ्ठल पाटील यांनी आपला पहिला पगार 10 हजार रुपये शाळेच्या नावे बँकेत कायमस्वरूपी ठेव ठेवून त्याच्या व्याजातून आलेली रक्कम 700 रू व सन्मान चिन्ह असा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त कु अंकिता जोतिबा पाटील या विद्यार्थिनीला देवून गौरव केल्याबद्दल शिक्षिका संध्याराणी पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष दिनकर पाटील व सर्व सदस्य, गावातील आजी-माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

