पोस्टाच्या विविध योजनांबाबत अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पोष्ट ऑफिसच्या विविध योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर येथील प्रवर डाक अधीक्षक अनुराग निखारे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यु इंग्लिश स्कूल व भावेश्वरी ज्युनियर कॉलेज हेब्बाळ - जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथे 'डाक सेवा - जन सेवा' अंतर्गत डाक मेळावा पार पडला. या मेळाव्यास गडहिंग्लज उपविभागाचे डाक निरीक्षक गणेश चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. श्रद्धा नलवडे होत्या.
प्रारंभी प्रास्ताविक कोवाडे शाखेचे पोस्टमास्तर जोतिबा पाटील यांनी केले. यावेळी डाक निरीक्षक गणेश चाटे यांनी पोस्टाच्या सेव्हींग अकाऊंट, आवर्ती ठेव योजना, सुकन्या समृध्दी योजना, महिला सम्मान सेव्हिंग सर्टिफिकेट, प्रधानमंत्री जीवनज्योती वीमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, आधार सेवा, डिजीटल पेमेंट, लाडकी बहीण योजना, नविन बाल आधार जिस्ट्रेशन करणे, जुने आधार अपडेट करणे, ग्रामिण टपाल जीवन विमा अपघाती विमा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी हेब्बाळ जलद्याळ उपसरपंच दिग्वीजय गुरव, पोलीस पाटील अनिल पाटील, बिद्रेवाडी सरपंच दत्तात्रय गुरव, पोलीस पाटील आशिष पाटील, उपसरपंच अन्नपुर्णा परीट, वाघराळी पोलीस पाटील प्रशांत पाटील, हेब्बाळ-जलद्याळ ग्रामपंचायत अधिकारी सौ. प्रियंका भापकर, वाघराळी उपसरपंच रोहिदास कातकर, हेब्बाळ-जलद्याळ न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य महेश देशमुख, महागाव पोस्ट मास्तर शशिकांत जगदाळे, गडहिंग्लजचे डाक सहाय्यक एम.जी. येसणे, डाक आवेक्षक रफिक मुल्लानी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन हेब्बाळ जलद्याळ पोस्ट मास्तर रमेश मामिलवाड यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. संतोष कुंभार यांनी केले. आभार रमेश मामिलवाड यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी तुकाराम शिंदे, शिवाजी जाधव, चाळोबा देसाई, किरण सुतार, प्रदीप सारंग, आकाश फराकटे, सिमरन मुल्ला, सुश्मिता गिरी यांचे विशेष सहकार्य लाभले.


