Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हेब्बाळ जलद्याळच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हेब्बाळ - जलद्याळ ( ता. गडहिंग्लज ) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे 1994 बॅचचे माजी विध्यार्थी गेल्यावर्षी अष्टविनायक यात्रा करून सलग दुसऱ्या वर्षी देखील एकत्र येऊन तिरुपती बालाजी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी दैवी शक्तींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहिल्यांदाच धार्मिक सहलीनिमित्य एवढ्या लांबचा प्रवास करून दर्शन घेतल्यामुळे सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता.



सहलीच्या आयोजनाचे नेतृत्व अमर यमगेकर, मोहन यमगेकर आणि आशा करंबळकर यांनी केले होते. हेब्बाळ जलद्याळ, मुंबई, शट्टीहळी, दड्डी, मोदगे, धोंडगट्टे आणि लिंगनूर येथून या मित्र - मैत्रिणीनी एकत्र येऊन आनंदाने प्रत्येक आठवण डोळ्यात साठवून सहल सुखरूप संपन्न केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.