ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांची असणार उपस्थिती
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजन
गडहिंग्लज : सारथी चॅरिटेबल ट्रस्ट, गांधी विचार मंच, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रसेवा दल यांच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त उद्या दिनांक ३० जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता कडगाव रोडवरील विश्रामबाग वसाहतीतील सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयात गांधी प्रेमींची सभा बोलाविण्यात आली आहे.
या सभेला ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी गांधी प्रेमींनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले आहे.

